कामथे ग्रामदेवता सुकाई मंदिराच्या १० एकर देवरहाटीत ३ हजार ५०० वृक्षारोपण*

 

चिपळूण तालुका शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटनेचा पुढाकार!

चिपळूण (प्रतिनिधी):-– हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची १११ व्या जयंती तसेच वनमहोत्सव निमित्त चिपळूण तालुका शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना यांच्यातर्फे कामथे ग्रामदेवता सुकाई देवी मंदिराच्या १० एकर देवरहाटीमध्ये ३ हजार ५०० वृक्षांचे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

या संघटनेचे अध्यक्ष अमित सावंत, सतीश मोरे, संजय थरवळ, बाळा ओतारी,अनंत पवार, प्रीतम कदम, सुजित मोरे, रुपेश खांडेकर, प्रथमेश बोभस्कर कमिटी चे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी कामथे गावातील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होता. सामाजिक वनीकरण, वन विभाग यामध्ये सहभागी होते.

व्यासपीठावर विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे साहेब,परीक्षेत्र वनाधिकारी राजेश्री किर, सामाजिक वनीकरण परीक्षेत्र वन अधिकारी परदेशी, पर्यावरण प्रेमी शौकत मुकादम, सामाजिक कार्यकर्ते अशोक भूस्कुटे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडीक, कामथे बुद्रुकच्या सरपंच हर्षदा कासार, कामथे खुर्दच्या सरपंच सरस्वती हरेकर, रोटरी क्लब अध्यक्ष अविनाश पालशेतकर, जमालुद्दीन बंदरकर,ग्रामसेवक कादवडकर, श्री. नाईक , तलाठी कोकाटे, देवस्थान कमिटी अध्यक्ष संभाजी खेडेकर, कामथे हरेकरवाडी, जावळे वाडीतील मुले सहभागी होती.

पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, विलास महाडीक,विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी उपस्थितीतांना संबोधित केले. आभार सतीश मोरे यांनी मानले.