आम. निरंजन डावखरे यांच्या स्थानिक निधीतून वितरण
गुहागर प्रतिनिधी
कोकणचे पदवीधर मतदार संघाचे आम. निरंजन डावखरे यांच्या स्थानिक निधीतून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी आदर्श शाळा जानवळे नंबर 1 शाळेसाठी संगणक व डिजिटल साहित्य मान्यवरांच्या हस्ते शाळेकडे सुपूर्द करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जानवळे गावच्या सरपंच जान्हवी विखारे,भाजपचे उपतालुका अध्यक्ष संदिप कोंडविलकर,माजी शिक्षक विश्वास बेलवलकर,महेश जाधव व ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोंडविलकर, प्रसन्न पाटील आणि जानवळे शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक कैलास शार्दुल शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.








