खेड : प्रतिनिधी : श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व जूनियर कॉलेज खेड या प्रशालेमध्ये इयत्ता १० वी मधील प्रथम ५ आलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या माध्यमातून मुलांना मोफत दप्तर व शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी सेवा सहयोग संस्था सदस्य सुयोग बेडेकर,प्रशाला समितेचे चेअरमन राजेश बुटाला,बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे चेअरमन पंकज शहा ,सदस्य संजय बुटाला ,सदस्य अजित बुटाला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.भोळे ,प्रायमरी मुख्याध्यापक श्री. चव्हाण ,पर्यवेक्षक श्री. कांबळे,प्रायमरी अँडमीन श्रीम.नाईक ,उच्च माध्यमिक शिक्षक श्री.पाटील,शिक्षिका सौ. लोखंडे ,शिक्षक श्री. धोत्रे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.











