सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव रेडकरवाडी येथील सुहास पेडणेकर यांच्या घरालगत असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात वास्तव्य करून राहिलेल्या भल्या मोठ्या नागराजाला अखेर सर्पमित्र राजन निब्रे यांनी पकडले. गेल्या काही दिवसात त्याने अनेक कोंबड्यांचा फडशा पाडला होता. यामुळे त्रस्त असलेल्या सुहास पेडणेकर यांनी अखेर सर्पमित्र राजन निब्रे यांना संपर्क केला.
त्यानंतर रात्रीची वेळ असूनही त्यांनी त्वरीत येऊन अडचणीच्या ठिकाणी लपून बसलेल्या या नागराजाला मोठ्या शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. घरालगत गेले काही दिवस वास्तव्य करून असलेल्या या नागराजाला अखेर तेथून बाहेर काढल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.










