सावंतवाडी । प्रतिनिधी :
मडगाव गोवा येथील प्रवाशांच्या पर्यायी व्यवस्था करिता एसटी प्रशासनाकडून कोकण रेल्वेने विशेष गाड्या मागविल्या. यातील सावंतवाडी स्थानकात येत असताना एक बस कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणादरम्यान नवीनच बांधण्यात आलेल्या गेटलगत चिखलात रुतून गेटला धडकली. त्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या. मात्र सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.










