साखरपा उपसरपंच ओंकार कोलते यांनी केले सहकार्य
शंकर वैद्य साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव दळवी वाडी येथील रोपवाटिका व्यवसायिक विनोद चव्हाण यांची मुलगी ईश्वरी हिची निवड आयआयटी साठी झाली आहे.
आयआयटी गुवाहाटी इथे ती आता बायोटेक्नॉलॉजी या विषयात इंजीनियरिंग करणार आहे.
कोंडगाव सारख्या छोट्या गावामध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन तिने हि झेप घेतली आहे.
शालेय शिक्षण साखरपा येथे पूर्ण केल्यावर अकरावी व बारावीचे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले.
तिथे शिकत असताना बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये तिला आवड निर्माण झाली आणि पुढे या विषयात करिअर करायची तिला इच्छा निर्माण झाली. पुढे पदवी शिक्षण वैभववाडी येथील महाविद्यालयामध्ये घेत तिने बी. टेक. पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर ईश्वरीचा खरा प्रवास सुरू झाला तो गेट परीक्षेच्या तयारीचा ही परीक्षा तिचा दर्जा त्याची पुरेपूर जाणीव ईश्वरीला होती. या परीक्षेसाठी कोंडगाव सारख्या ठिकाणी क्लासेस नाहीत त्यामुळे तिने स्वतः तयारी करायचे ठरवले. सहा महिने तीने कठोर परिश्रम घेतले. त्यासाठी ती कोल्हापूर येथे जाऊन राहिली तिथे पेक्सर लायब्ररीत नियमित अभ्यासासाठी जात असे रोज सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत ती लायब्ररीत अभ्यास करीत असे. इंटरनेट हे एकमेव माध्यम ईश्वरी साठी होतं. गेट परीक्षेसाठी असणाऱ्या विविध चैनल वरून तिने अभ्यास केला.
पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या वैभववाडी कॉलेजचे प्राध्यापक एस. बी. निहारकर यांनी तीला प्रोत्साहन दिल्याचे ईश्वरीने आवर्जून सांगितले.
संशोधन क्षेत्रामध्ये तिला आपली कारकीर्द घडवायची आहे
केवळ इंजिनिअर होऊन तीला थांबायचे नाही तर
तिला बायोटेक्नॉलॉजी मध्ये डॉक्टरेट पदवी घ्यायची आहे. आयआयटि मध्ये शिकताना सेलबायोलॉजी, व्हेक्सीन यापैकी कोणत्यातरी विषयात किंवा मायक्रोस्कोप, स्टरीलायझर अशा ऊपकरणांवर प्रोजेक्ट करायचा आहे.
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तथा साखरपा ग्रामपंचायत माजी सरपंच श्री ओंकार कोलते यांच्या विशेष सहकार्यामुळे कुमारी ईश्वरी हिला शासकीय दाखले वेळेत मिळाले, त्यामुळे तिला आय आय टी प्रवेश घेण्यासाठी सोईस्कर झाल्याचे ईश्वरीने सांगितले . तसेच
गरजूंना मदत मिळवून देण्यासाठी श्री ओंकार कोलते सदैव कार्यरत असतात.
त्यामुळे कोंडगाव दळविवाडितील ग्रामस्थांनी ओंकार कोलते यांचे आभार मानले .
ईश्वरी चव्हाणच्या यशाबद्दल साखरपा पंचक्रोशीतून अभिनंदनचा वर्षा होत आहे.











