“मेहनतीने यश मिळवून खेळाचे नाव उंचवा” : तहसीलदार ओंकार ओतारी 

 

 

वेंगुर्ला तालुका शासकीय क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन

वेंगुर्ले l दाजी नाईक :आपल्या मातीशी इमान राखून, प्रामाणिक म़ेहनत घेणाऱ्याला यशाची शिखरे नेहमी पादाक्रांत करता येतात. आईवडील व क्रीडा प्रशिक्षक गुरूंवर श्रद्धा आदर ठेवून, विद्यार्थी खेळाडूनी मेहनतीने यश मिळवून खेळाचे नाव उंचवावे,असे आवाहन उद्घाटक वेंगुर्ला तहसीलदार श्री ओंकार ओतारी यांनी अणसूर पाल हायस्कूल अणसूर येथे आयोजित वेंगुर्ला तालुका शासकीय क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन प्रसंगी केले.

वेंगुर्ला तालुका शासकीय शालेय क्रीडा स्पर्धां २०२४-२५चा उद्घाटन सोहळा मंगळवारी दिनांक १६ जुलै २०२४ रोजी अणसूर पाल हायस्कूल अणसूर येथे शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा. वेंगुर्ला तहसीलदारओंकार ओतारी साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे, शालेय समिती चेअरमन मातोंडकर एम. जी., सदस्य दिपक गावडे,सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मा. योगेश फणसळकर , खजिनदार राजेश निर्गुण, वेंगुर्ला तालुका कॅरम असोसिएशनचे शंकर वजराटकर, स्पर्धा पुरस्कर्ते वेंगुर्ला मिडटाऊन रोटरी प्रेसिडेंट योगेश नाईक , उद्योजक अंकुश गावडे, आधार फाउंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर, माजी सहसचिव जयराम वायंगणकर, सहसचिव संजय परब, वेंगुर्ला तालुका मुख्याध्यापक संघ सेक्रेटरी किशोर सोन्सूरकर, वेंगुर्ला क्रीडा केंद्राचे संजीवनी चव्हाण जयवंत व चुडनाईक, अक्षता पेडणेकर, चारुता परब, मुख्याध्यापक व क्रीडा प्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते तहसीलदार ओंकार ओतारी यांचा संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच, वेंगुर्ल्यात क्रीडा विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणारे वेंगुर्ला तालुका क्रीडा समितीचे माजी सहसचिव क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर यांचा चेअरमन मातोंडकर एम.जी.यांच्याहस्ते तर वेंगुर्ला क्रीडा केंद्राच्या माध्यमातून, विद्यार्थी खेळाडू घडविण्यासाठी गेले अनेक वर्षे देत असलेल्या योगदानाबद्दल जयवंत चुडनाईक यांचा दिपक गावडे यांच्या हस्ते तर संजीवनी चव्हाण यांचा उद्योजक अंकुश गावडे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थी खेळाडूंच्या भरघोस उपस्थितीबद्दल अभिनंदन करून, स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन सोहळ्यानंतर , वेंगुर्ला तालुका शासकीय शालेय कॅरम स्पर्धा १४,१७ व १९ वर्षांखालील वयोगटातील मुलगे व

मुली या गटात खेळविण्यात आल्या. यामध्ये तालुक्यातील १५० पेक्षा अधिक सहभागी कॅरम विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत अणसूर पाल हायस्कूल मुख्याध्यापक राजेश घाटवळ, सूत्रसंचालन विजय ठाकर व आभार वेंगुर्ला तालुका क्रीडा समिती सहसचिव संजय परब यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अणसूर पाल हायस्कूल अणसूर , रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व वेंगुर्ला तालुका कॅरम असोसिएशन यांचे बहुमोल सहकार्य लाभले.