Young magician Ketan Kumar felicitated by MNS
राज्य शासनाचा युवा कला गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल केला सन्मान
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासनाचा महाराष्ट्र युवा कला गौरव २०२२ उत्कृष्ट युवा जादूगार पुरस्कार प्राप्त सावंतवाडी कुणकेरी गावचे सुपुत्र युवा जादुगार केतनकुमार उर्फ केतन सावंत याचा मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी आणि महेश परब यांच्या हस्ते सावंतवाडी येथे सत्कार करण्यात आला.
सावंतवाडीतील आढावा बैठकी दरम्यान मनसे पक्षाच्यावतीने केतन सावंत यांना मनसेतर्फे गौरविण्यात आले. यावेळी ॲड. अनिल केसरकर आणि सर्व मनसैनिकांनी केतन सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी केतन सावंत यांनी मनसे पदाधिकारी व उपस्थित मनसैनिकाचे आभार मानले. यावेळी सावंतवाडी तालुक्यातीत मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.
Sindhudurg