तोंडवलीतून चोरीस गेलेल्या दुचाकीचा पोलिसांकडून छडा
स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची कार्यवाही
कणकवली : तालुक्यातील तोंडवली येथील रवींद्र बोभाटे यांच्या मालकीची होंडा अक्टिव्हा कंपनीची ही दुचाकी ५ जुलै रोजी चोरीस गेली होती. याबाबत त्यांच्या तक्रारीवरून १० जुलै रोजी कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, पोलिस हवालदार किरण देसाई, बस्त्याव डिसोजा, आशिष जामदार, जयेश सरमळकर यांनी दुचाकीचा छडा लावला. पंचनामा करून ती दुचाकी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. तोंडवलीतून कसालपर्यंत दुचाकीचा प्रवास कसा झाला याबाबतचा तपास कणकवली पोलिस करत आहेत.
*गाडी सापडली कसालमध्ये*
याबाबतचा तपास कणकवली पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) समांतररीत्या करत होते.
मंगळवारी एलसीबी पथक गस्तीवर असताना कसाल- बालमवाडी येथे महामार्गाच्या बाजूला ती पांढऱ्या रंगाची दुचाकी बेवारसरीत्या उभी असलेली दिसली. खात्री केली असता, ती चोरीस गेलेली दुचाकी होती.











