चोरी प्रकरणी सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलीस कोठडी

चोरी प्रकरणी सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलीस कोठडी

कणकवली : कणकवतील बॅ.नाथ पै नगर येथील सिंधुदुर्ग जिल्हा रेल्वे स्टेशनचे वर्क शॉप फोडून कॉपर तारेचे बंडल व कॉपरचे तुकडे असे २ लाख ३४ हजार किंमतीच्या साहित्य चोरी प्रकरणी कणकवली पोलीसांनी सोमवारी रात्री सातारा जिल्ह्यातील ताब्यात घेतलेल्या संतोष सावकार जाधव (२३) श्रीकांत सावकार जाधव (रा. दोन्ही तासगांव-सांगली) यांना येथील न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणी पहिला अटक केलेला आरोपी हंबीरराव सावळा गोसावी याची पोलीस कस्टडी गुरूवारी संपणार आहे. चोरीची घटना २४ जूनला उघडकीस आली होती. यानंतर १७ दिवसांनी पन्हाळा येथून हंबीरराव सावळा गोसावी याला पोलीसांनी अटक केली होती. सोमवारी रात्री पोलीस उपनिरिक्षक अनिल हाडळ व सागर शिंदे हवालदार पांडुरंग पांढरे यांच्या पथकाने सातारा जिल्ह्यातून आणखी दोन आरोपींना अटक केली.