भालावल येथील दशावतार कलावंत बापू उर्फ दाजी परब यांचे निधन

 

आईचे निधन होऊन महिनाही लोटला नाही

ओटवणे (प्रतिनिधी) भालावल गावचे रहिवासी आणि दशावतारातील एक अष्टपैलू कलावंत ज्यांनी उमद्या वयात दशावतराची कास धरली आणि अल्पावधीत नाव लौकिक कमावलं आणि गेली १८ वर्षे दशावताराची सेवा केली ते बापू उर्फ दाजी परब वय 48 यांचे आज पहाटे राहत्या घरी दुःखद निधन निधन झाले.

दाजी परब यांना दशवातराची प्रचंड आवड यामुळें हौशी कलाकार म्हणून दशावतारात काम करता करता नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनीत संधी मिळाली आणि उत्कृष्ठ खलनायक सादर करत बरीच वर्ष आजगावकर कंपनीत काढली त्यानंतर काही वर्षे चेंदवणकर दशावतार कंपनी मध्ये भूमिका साकारल्या व त्यानंतर आजगावकर पारंपरिक दशावतार नाटय कंपनी मध्ये कला सादर केली. आपल्या विशिष्ट प्रकारच्या खलनायक अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. ते सध्या आजगावकर दशावतार कंपनीत कार्यरत होते . मात्र गेली वर्षभर दुर्दर आजाराशी झुंज देत होते त्यामुळें दशावतार पासून दूर होते. अखेर त्यांची ही आजारपणाशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि दशावतारातील एका उमद्या खलनायकाची अकाली एक्झिट झाली. त्यांच्या आईच्या निधनाला एक महिनाही झाला नाही तोवर दाजी परब यांचे निधन झाल्याने परब कुटुंबावर अजुन एक धक्का बसला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक बहिण दोन भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे येथील एकनाथ परब व बाबू परब यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले यावेळी दशावतरी कलावंत दादा राणे कोनसकर, उदय कोनसकर सह अनेक दशावतारातील कलावंतांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्यावर दुखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.