7 वी राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांडो स्पर्धा 2024 नुकतेच 19 ते 21 जुलै रोजी भद्रावती चंद्रपूर येते संपन्न झाल्या, रत्नागिरीतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेत गौरी अभिजीत विलणकर हिने 59 किलो खालील वजनी गटात तर, स्वरा विकास साखळकर हिने पूमसे प्रकारात सुवर्ण पदक पटकावले
विजेत्या खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री.प्रशांत मनोज मकवाना श्री शाहरुख शेख महिला प्रशिक्षक सौ. आराध्या मकवाना, खेळाडूंना यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विजेते खेळाडूना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रविण बोरसे, धुळेछंद मेश्राम खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांडो प्रशिक्षक मिलिंद भागवत रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, चे सर्व पदाधिकारी, पालक वर्ग , खेळाडूच अभिनंदन केले जात आहे.










