आमदार नितेश राणे यांनी महेश भाबल यांना दिला मदतीचा हाथ

 

20 जुलै रोजी देवगड तालुक्यातील कट्टा येथे झालेल्या मुसळदार पाऊस आणि वादळी वारा यामुळे मंगेश भाबल यांच्या राहत्या घरावर आंबा कलम झाड कोसळून घराचे फार मोठे नुकसान झाले होते

.या मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही .ही बातमी आमदार नितेश राणे यांना कळताच तात्काळ प्रशासकीय यंत्रणांना सूचना करून सदर नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आणि नुकसानग्रस्थांना जास्तीत जास्त सरकारी मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.त्यानुसार तालुका तहसिलदार तसेच स्थानिक तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि तसा अहवाल पाठवला.आमदार नितेशजी राणे एवढ्यावरच न थांबता त्यांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांना तात्काळ घटनेची पाहणी करण्याची सूचना केली.

त्यानुसार जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंगेश लोके ,माजी जि. प. सदस्य सुभाष नार्वेकर ,कट्टा ग्रामपंचायत सरपंच सौ.श्वेता कोयंडे ,ग्राम. प. कर्मचारी संतोष करंगुटकर यांच्यासह घटना स्थळाची पाहणी केली आणि या घटनेचे गांभीर्य आमदाराना सांगितले.याची दाखल घेऊन आमदार नितेशजी राणे यांनी सरकारी मदतीची वाट न पाहता स्वखर्चाने सदर घराला लागणारे सर्व सिमेंट पत्रे तात्काळ पाठवण्याची व्यवस्था केली त्यामुळे भाबल कुटुंबियांना मोठा आधार मिळाला.

 

आमदार नितेशजी राणे यांच्या या कार्याचे कट्टा गावात मोठे कौतुक होत आहे .