निळवणे रस्ता खचला ग्रामस्थ सरसावले पर्यायी पायवाटेसाठी

 

खेड(प्रतिनिधी) मुसळधार पावसामुळे तालुक्यातील निळवणे-कातळवाडी येथील रस्ता पूर्णत: खचल्याने वाहतूक पूर्णपणे खंडित झाली आहे: रस्त्याअभावी शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गावचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पर्यायी पायवाटेसाठी ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत.

 

 

प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे. निळवणे-कातळवाडी खचलेल्या रस्त्यामुळे वाहतूक ठप्प होवून ग्रामस्थांची परवडच सुरू झाली आहे. ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने एसटीसह अन्य वाहनांची वाहतूक देखील बंद झाली आहे. सोमवारी शाळकरी विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. ग्रामस्थांचा एकमेकांशी संपर्कच तुटला आहे. पर्यायी मार्गच नसल्याने ग्रामस्थांची कोंडी झाली
आहे. यासाठी ग्रामस्थ पर्यायी पायवाटेसाठी पुढे सरसावले.