सहाय्यक अभियंता यादव आणि कोळे यांनी सावंतवाडी कार्यालयात भेटीची वेळ देवून न आल्याने ग्रामस्थ आक्रमक.
पोलीस अधिकारी दाखल.
ओटवणे(प्रतिनीधी) ओटवणे ग्रामस्थ गेले दोन महिन्यापासून विजेच्या समस्येने त्रस्त असून कित्तेक वेळी याची कल्पना देवूनही कार्यालयात जावून खडसावल्यानंतरही यात कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर ग्रामस्थांचा सय्यम सुटला आणि आक्रमक ग्रामस्थानी कार्यालयात जात सहाय्यक अभियंता आर. आर. मोरे यांनाच धारेवर धरले. काल प्रत्यक्ष भेटून अधिकाऱ्यांना कार्यालयात भेटीची वेळ घेतली.ओटवणे ला येणारी वीज हि इन्सुली, वाफोली विलवडे भागातून येत असल्याने या विभागाचे अभियंता कोळे आणि यादव हे जोवर येवून प्रश्नांची उत्तर देणार नाही तोवर कार्यालय सोडणार नसल्याची आक्रमक भूमिका ग्रामस्थानी घेतली.
यावेळी ओटवणे विभागाचे अभियंता आर.आर.मोरे यांना कर्यालयात चांगलेच खडसावले.जर वीज वितरण अधिकारी वेळ देवुन ग्रामस्थांना किंमत देत नसतील तर या मुजोर अधिकाऱ्यांना आमच्यापरिने आम्हीं जाब विचारतो आम्हीच काय करायचे ते ठरवतो असे खडसावल. यावेळी रवींद्र म्हापसेकर, संतोष तावडे, स्वप्नील उपरकर, उपसरपंच संतोष कासकर, संतोष तावडे,ग्राम. सदस्य प्रशांत बुराण, अक्षय तळडेकर , जय गणेश गावकर, अनंत तावडे, सत्यवान गावकर, प्रमोद केळुसकर, विनायक वर्णेकर, स्वप्नील म्हापसेकर, राजन तारी, उमेश म्हापसेकर, सगुण गावकर पत्रकार दिपक गावकर, रविंद्र गावकर,सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.












