नांदोस सारंगवाडी येथे तरुणाचा बुडून मृत्यू

मालवण | प्रतिनिधी : नांदोस सारंगवाडी येथील गणपती घाटात पोहण्यास गेलेल्या प्रमोद दीपक गुराम (वय ३२) रा. वरची गुरामवाडी या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद गोरे, विनोद गुरव व प्रमोद गुराम हे तिघे जण दुपारी नांदोस सारंगवाडी येथील गणपती घाटात पोहण्यासाठी गेले होते. यात प्रमोद गुराम हा खोल पाण्यात पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी प्रकाश मोरे, सिद्धेश चिपकर हे करत आहेत.