वाडोस,नेरूर, शिवापूर विभागात ६७० विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप

भाजप आणि युवा उद्योजक गणेश कदम यांचा उपक्रम

शिवापूर :भारतीय जनता पार्टी आणि युवा उद्योजक गणेश कदम यांच्यावतीने माणगाव खत्यात ६७० विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले.वाडोस हायस्कूल, नेरूर हायस्कूल, पुळास शाळा, शिवापूर नं१ , शिवापूर गाववाहाळ, वसोली हायस्कूल, चाफेली शाळा, उपवडे शाळा, वासोली प्राथमिक शाळा, मोरे शाळा अशा शाळेतील विद्यार्थ्यांना या वयांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सभापती मोहन सावंत, उद्योजक गणेश कदम, ग्रामस्थ शांताराम, कदम, मनोहर दळवी,ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम,तेजस शेडगे, सुधीर गुंजाळ, परेश बावकर, आकाश नाईक, अरुण राऊळ, हिरजी राऊळ, आदी सह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.