हरकूळ खुर्द मध्ये कृषीदूतांकडून बोर्डो पेस्ट चे प्रात्याक्षिक

 

फोंडाघाट :             ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषी दूत यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत हरकुळ खुर्द येथे कृषीकदूतां कडून बोर्डो पेस्ट चे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

बोर्डो पेस्ट हे एक बुरशीनाशक असून ते अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला व फळबागांवरील रोगांवर एक प्रभावी उपाय आहे. ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषी दूत विद्यार्थ्यांनी प्रथम एक किलो चुना पावडर, एक किलो मुरचूद आणि १० लीटर पाणी याची बोर्डो पेस्ट तयार केली. बोर्डो पेस्ट ही झाडाच्या बुरशीजन्य भागावर वापरली जाते. विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकाचे महत्व, बोर्डो पेस्ट तयार करताना घ्यावयाची काळजी याची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली.

या प्रात्यक्षिकासाठी योगेश दंताळ, ऋतुराज सावंत, दुर्वेश रावराणे, नमित आचरेकर, सौरभ पुजारी, हर्ष शेट्ये, सोमनाथ वेटे, मोहनिश देसाई, दिपक वाडेकर, विनायक मोडक उपस्थित होते हे प्रात्यक्षिक घेताना महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. संते सर, कार्यक्रम समन्वयक श्री. मोटे सर, प्राध्यपिका पुजारी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.