वैभववाडीत उद्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आढावा बैठक

आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी प्रतिनिधी
कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे शनिवार दि. २७ जुलै रोजी वैभववाडी दौऱ्यावर असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वपूर्ण योजनेचा आढावा घेणार आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे शनिवार दि. २७ जुलै रोजी दु. २ वाजता वैभववाडी रेल्वे स्थानक भेट, स्थानकावरील समस्या घेणार जाणून, दु. २.३० वा. वैभववाडी बस स्थानकला भेट, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी करणार प्रयत्न, तसेच दु. ३ वा. पंचायत समिती वैभववाडी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला संबंधित अधिकारी, तालुक्यातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच रेल्वे स्टेशन व बसस्थानक भेट प्रसंगी कोकण रेल्वेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व एसटी प्रशासनअधिकारी उपस्थित राहणार आहेत.