वादळी वाऱ्यामुळे फटका : दुसरा ही पडण्याच्या
वेंगुर्ले : दाजी नाईक
चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून उभादांडा सागरेश्वर समुद्रकिनारी एमटीडीसी ने उभे केलेल्या सहा लाकडी तंबूं पैकी एक तंबू वादळी वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाला आहे. तर दुसरा पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शासनाचा पैसा वाया गेला आहे.

सागरेश्वर समुद्रकिनारी पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसी विभागाने लाखो रुपये खर्च करून सुंदर असे लाकडी टेंट उभे केले होते. यामध्ये एका टेंट मध्ये स्वच्छतागृह, आणि अन्य टेंट मध्ये पर्यटकांना विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र सध्या सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे यातील एक टेंट पूर्णपणे जमीन दोस्त होऊन शासनाचा पैसा वाया गेला आहे. तर आणखी एक टेंट जमिनीच्या दिशेने कलंडला असून तो सुधा पडण्याच्या स्थितीत आहे.












