सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगांव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज सोमवार ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.
या निमित्त मंदिरात सकाळपासून अभिषेक पूजा आदी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. तर रात्री मंदिराभोवती पालखी परिक्रमेनंतर मळगांव येथील दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानकरी व देवस्थान कमिटीने केले आहे. .
Sindhudurg