मालवण शहरात हायक्लास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार!

भाजप नेते निलेश राणे यांनी बॅडमिंटन व टेबलटेनिस प्रशिक्षकांना केले आश्वस्त

अमित खोत | मालवण : खेळाडूंना दर्जेदार सोई सुविधा उपलब्ध असणारे हायक्लास दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मालवण शहरात उभारणार. असे सांगत भाजप नेते निलेश राणे यांनी मालवण येथील बॅडमिंटन व टेबलटेनिस प्रशिक्षकांना आश्वस्त केले. दरम्यान, सध्य स्थितीत खेळाडू घडवत असताना जे काही लागेल ते सांगा. सदैव सोबत आहे. असा विश्वासही निलेश राणे यांनी दिला.

बॅडमिंटन, टेबलटेनिस या क्रीडा प्रकारात मालवणातील अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रतिनिधित्व करतात. मात्र या खेळाडूंना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देता यावे यासाठी मालवण शहरात बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस टेबल्स यासह सुसज्ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणी झाल्यास अधिक दर्जेदार खेळाडू घडतील. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणीची व्हावी. अशी मागणी बॅडमिंटन व टेबलटेनिस प्रशिक्षकांच्या वतीने भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली. त्याला निलेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी भाजपा पदाधिकारी अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा परब, बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, विकी तोरसकर, वसंत गांवकर, राजु बिडये, ललित चव्हाण, राकेश सावंत, निषय पालेकर यांसह अन्य उपस्थित होते.

निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार

खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत टेबलटेनिस क्रीडा प्रकारासाठी 13 खेळाडूंची निवड झाली विविध राज्यातून झाली. त्यात मालवणचे तीन खेळाडू आहेत. तर बॅडमिंटन मध्ये एका खेळाडूची निवड झाली. या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या मालवण येथील चंद्रकांत साळवी, महेश परब, सुजन परब यां प्रशिक्षकांचा सत्कार निलेश राणे यांच्या हस्ते मालवण भाजपा कार्यालय येथे शहरअध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आला.