नाशिक येथे होणार पुरस्काराचे वितरण.
कुडाळ :-कवी अरुण नाईक यांच्या बरड लागलेला दरवाजा या कविता संग्रहास नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा व साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा कविवर्य नारायण सुर्वे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
15 ऑक्टोंबर रोजी हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. नाशिक येथे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. १० हजार रुपये,सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिक येथे होणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्ताने होणाऱ्या साहित्य संमेलनाला त्या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचा हस्ते काव्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयत होणार आहे.
कवी अरुण नाईक यांच्या या आधीच्या `अंधारवर्तुळातील वेदनापट`, या भाऊ चर्चित कविता संग्रहालय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा `विशाखा`काव्य पुरस्कार लाभला आहे. तसेच कवी अरुण काळे स्मृती अज्ञातशत्रू,काव्य पुरस्कार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य गौरव पुरस्कार, श्रीपाद काळे पुरस्कार, साहित्य ज्योती आधी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
भारतीय संविधानाला अभिप्रेरित असलेल्या सामाजिक, समता न्याय व स्वातंत्र्याच्या आजच्या स्थितीविषयीची ही कविता मानवी समाजात लागलेली विनाशक किड मांडते आजच्या मराठी कवितेतील सद विवेकाच्या शिखरावर गेलेली झुंजार कविता आहे. असे निरीक्षण जेष्ठ गावी समीक्षा यशवंत मनोहर यांनी कविते संदर्भात नोंदविले आहे. त्यांच्या पुरस्काराबाबत त्यांचे जिल्हा भरातून अभिनंदन केले जात आहे.












