जि.प.च्या अकरा शाळांवर ‘ऑफ ग्रीड रूफ्ट ऑफ सोलर’ योजना राबवणार : संदीप गावडे

वाढदिवसाच्या निमीत्ताने केला ‘पीएम सोलार ‘ संकल्पनेचा शुभारंभ

सावंतवाडी । प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम सोलार ‘सारखी महत्वपूर्ण योजना जाहीर केली. येणाऱ्या काळात वीजेची समस्या अजून जटील होणार आहे. विजेची मागणी पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा जि.प.च्या अकरा शाळांना ‘ऑफ ग्रीड रूफ्ट ऑफ सोलर’ ही योजना राबवीली जाणार आहे अशी माहिती भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी दिली. वाढदिवसाच्या निमीत्ताने त्यांनी या संकल्पनेचा शुभारंभ केला.

ते म्हणाले, या संकल्पनेमुळे शाळांमध्ये ज्यावेळी वीज पुरवठा खंडीत असेल त्यावेळी सोलारवर वीज वितरण होणार आहे‌. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या ‌ प्रेरणेतून ‘ऑफ ग्रीड रूफ्ट ऑफ सोलर सिस्टम ‘वर सावंतवाडी तालुक्यातील अकरा शाळांची निवड आम्ही केली असून लवकरच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या उपक्रमाचे लोकार्पण केल जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

अनेक शाळांना मोठ्या प्रमाणात वीज बिले येत असल्याने त्याची समस्याही निर्माण झाली आहे. सोलार सिस्टीममुळे शाळांच्या वीजबिलाचा खर्चही कमी होईल. यासाठीच संपूर्ण तालुक्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. सद्य स्थितीत आमच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर आम्ही हा प्रकल्प राबवित आहोत‌, अशी माहितीही संदीप गावडे यांनी दिली.

यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सचिव अजय सावंत, तळवडे ग्रा.प. सदस्य दादा परब, आदी उपस्थित होते.