वन्य हत्तीचा मोर्चा तळकट मध्ये..

नारळ सुपारी बागायतीवर लक्ष!!!

लाखोची नुकसानी डोळ्यादेखत शेतकरी हतबल !!

दोडामार्ग l सुहास देसाई :दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी यांच्या बागायतीवर दिवसेदिवस जंगली हत्तीचा उपद्रव वाढतच चालला असून झोंलबे गावातून हत्ती कळप पुन्हा तळकट भागात आल्याने शेतकरी भयभीत झाले आहे या गावातील शेतकरी सुनील सावंत या शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात बागायती नारळ सुपारी केळी सह अन्य पिकांच्या नासधूस करत नुकसानी केली आहे बागायती पिके नुकसान करत हती कळप स्थिरावला आहे त्यामुळे जंगली हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे

 

दोन दिवसांपूर्वी रात्री तळकट भागात असणारे वन्य हत्ती झोळंबे गावात दाखल झाले होता हे हत्ती झोळंबे तील राऊळवाडी, भिडेवाडी भागात फिरुन दिवसा हत्ती इंदळवाद, शिदावर जंगलात होते त्यांनतर एकूण पाच हत्ती झोळंबे हून आता तळकट मध्ये दाखल झाल्याने ग्रामस्थात भितीचे वातावरण पसरले आहे

याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे