कणकवली : माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागामध्ये शासन स्तरावर अनेक विषय प्रलंबित आहेत या विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या दिनांक 19 जुलै रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या सभेत ठरल्यानुसार या मागण्यांची जाणीव शासनाला होण्यासाठी मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत ओरोस येथे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले.एकाचवेळी राज्यभर हे आंदोलन होणार आहे.हे आंदोलन संस्था चालक संघटना, सर्व संस्था चालक, जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांना बरोबर घेऊन एकत्रितपणे करण्यात येणार आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा एज्युकेशनल जर्नलचे संपादक श्री.वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनी सांगितले आहे. शासन स्तरावर गेल्या अनेक वर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर अनेक वर्ष अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शासनाचे वारंवार याकडे लक्ष वेधून सुद्धा शासनाने या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे .या मागण्यांमध्ये शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करावी, पवित्र पोर्टल वरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी. अशा विविध मागण्या केल्या.
आज जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, शिक्षणाधिकारी माध्यमिक सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ओरोस पोलीस स्टेशन या ठिकाणी या आंदोलनाचे नोटीस देण्यात आले. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे, सचिव श्री गुरुदास कुसगावकर ,उपाध्यक्ष श्री रामचंद्र घावरे, श्री हनुमंत वाळके कार्यकारणी सदस्य श्री रत्नाकर सरवणकर,श्री सुभाष दहिबांवकर श्री प्रमोद कांबळे सर श्री जयवंत ठाकूर सर श्री शरद चोडणकर सर ,श्री भरत सराफदार सर, वेंगुर्ला तालुका सचिव श्री सोन्सुरकर सर ,सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री सावंत सर, मालवण तालुका सचिव श्री घाडी सर कणकवली तालुका सचिव श्री अत्तार सर ,अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री अजय शिंदे सर सचिव श्री.मयेकर सर, कास्ट्ईब महासंघाचे राज्य उपाध्यक्ष श्री संदीप कदम सर जिल्हा सचिव श्री अभिजीत जाधव, मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री दिनेश म्हाडगुत इत्यादी उपस्थित होते.











