महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा निषेध!
आरटीआय कार्यकर्ते साईराज कल्याणकर
सिंधुनगरी : प्रतिनिधी
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक सचिन हराळे महाराणा प्रकरणी, महसूल संघटनेने पुकारलेले काम बंद आंदोलन हा प्रकार जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरणारा आहे. महसूल कर्मचारी संघटनेच्याय या कामबंद आंदोलनाचा आपण तीव्र निषेध करीत आहोत, आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल झालेली तक्रार खोटी असून संघटनात्मक ताकद चुकीच्या पद्धतीने वापरली जात आहे अशी प्रतिक्रिया आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी मुख्यालय पत्रकारांसमोर दिली.
कथित मारहाण घटनेवेळी हराळे व आपल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप आपण स्वतः रेकॉर्ड केली आहे. त्या घटनेची संपूर्ण ऑडिओ क्लिप मुख्यालय पत्रकारांसमोर श्री कल्याणकर यांनी ऐकून दाखविली. हा पुरावा आपल्याकडे असून श्री सचिन हराळे या कर्मचाऱ्यांने वर्तन केले आहे आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे, १८ जुलै १९९४ च्या शासकीय कर्मचारी शासन निर्णय सहितेनुसार अशोकनीय ठरेल असे कृत्य करू नये असे बंधन कर्मचाऱ्यांना असताना त्याचे उल्लंघन त्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे या ऑडिओ क्लिप मध्ये उघड झाले आहे असेही श्री कल्याणकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाण व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून महसूल यंत्रणा व खणीकर्म विभाग शासनाचे मोठे नुकसान करीत आहे. आपण आरटीआय कार्यकर्ता असून सावंतवाडी तालुक्यात निगुडे येथे 34 खाणी सुरू आहेत. मात्र त्यातील तेरा ठिकाणीच परवानगी दिली आहे व उर्वरित ठिकाणच्या खाणी बेकायदेशीरपणे सुरू आहेत. याची आपण माहिती मागविली होती. या माहितीचा अर्ज आपल्याकडे उपलब्ध नाही असे सांगत संबंधित कर्मचाऱ्याने हात वारे करत आपल्या अंगावर धावून आला व आपल्यासोबत बेशिस्त वर्तन केले. व त्यानंतर हा प्रकार झाला अशी कैफियत श्री कल्याणकर यांनी पत्रकारांसमोर मांडली.
शासकीय कर्मचारी संघटित असून ते सर्व सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले आहे. मीही या घटनेची वरिष्ठ पातळीवर तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्या कर्मचाऱ्यांची तक्रार करीत आहे. याबाबतची सखोल चौकशी होईल व पुढील कार्यवाही होईल. मात्र महसूल संघटनेने आंदोलन करून जनतेला ब्रिटिश धरण्याचा केलेला प्रयत्न चुकीचा आहे. अनेक कामातील महसूल विभागाची दिरंगाई जग जाहीर आहे. मोठ्या माणसाच्या दबावाखाली महसूल प्रशासन काम करीत आहे असा थेट आरोप ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दहा दिवसापूर्वी केला होता. मात्र जिल्हावासीय जनता महसुली विभागाच्या दिरंगाईत होरपळलेली असून संघटित नसल्यामुळे जनतेला कोणीच वाली नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने घेतलेल्या या निर्णयाचा आपण निषेध करत आहोत असेही साईराज कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे.











