आकास्मिक निधन झालेल्या ओवळीये येथील दशावतार कलावंत कुटुंबियांना भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून आर्थिक मदत

 

 

मालवण | प्रतिनिधी : ओवळीये वायंगणीवाडी येथील दशावतारी कलाकार नंदकुमार बाबाजी चव्हाण यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व चार लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. चव्हाण कुटुंबियांना भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.

 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजु परुळेकर, शक्तीकेंद्र प्रमुख बबन परब, माजी उपसरपंच आशुतोष सावंत, ग्राप सदस्य अविनाश घाडीगांवकर, बुथ अध्यक्ष विनायक चव्हाण, संतोष गावकर, दीपक सुर्वे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.