कनक सिंधू विश्रामगृहा समोर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण

कणकवली
कनक सिंधू या कणकवली येथील शासकीय विश्रामगृहा समोर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कुडाळ मालवण विभाग प्रमुख बबन शिंदे,नियोजन मंडळाचे सदस्य राजा गावकर, दामू सावंत,भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री,युवक भाजप जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, वागदे सरपंच संदीप सावंत, माजी सभापती दिलीप तळेकर, रवी पाळेकर उपसरपंच सर्वेश दळवी आदींसह असंख्य भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. तर सार्वजनिक बांधकाम चे उपविभागीय अभियंता श्रीमती के.के.प्रभू, उपविभागीय अभियंता व्ही.व्ही.जोशी, सहाय्यक अभियंता सी.आर. बासुतकर, शाखा अभियंता पी. व्ही. कांबळे व आभियंता आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.