खेड(प्रतिनिधी)
प्रसूत होऊन गंभीर आजारी झालेल्या खेड तालुक्यातील धामनंद बौद्ध वाडी मधील २७ वर्षीय विवाहितेचा उपचारा दरम्यान निधन झाल्याची घटना २९ जुलै रोजी १२ ३० वा च्या सुमारास वालावलकर रुग्णालयात घडली
सौ. माधुरी सुशील मोहिते असे त्या निधन झालेल्या विवाहितेचे नाव आहे. यातील मयत हिचे ८ वर्षा पूर्वी लग्न झालेले असुन ती ९ महिन्याची गरोदर होती. तिला बेशुद्ध अवस्थेत वालावलकर रुग्णालय डेरवण ता. चिपळुण येथे अॅडमिट केलेले होते. तीची सिझेरियन डिलीव्हरी झालेली होती. तीच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झालेल्या होत्या म्हणुन ती बेशुध्द अवस्थेत होती. त्यापासून तीचेवर तेथे औषधोपचार चालु असताना ती मयत झाली या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे










