सुकीवली मध्ये मुलाची बापाला मारहाण गुन्हा दाखल

खेड(प्रतिनिधी)
मद्य प्राशन करून घरात येऊन विनाकारण वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या मुलावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सुकीवली सोनार वाडी येथे घडली.
या प्रकरणी गजानन शंकर खांडेकर रा-सुकीवली सोनारवाडी यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तर गणेश गजानन खांडेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०४ ऑगस्ट रोजी रोजी सांयकाळी ७.०० वा चे सुमारास  सुकिवली सोनारवाडी  येथे राहते घरी यातील फिर्यादी हे देवा जवळ दिवा बत्ती करित असताना त्यांचा मोठा मुलगा गणेश  हा  दारु पिवुन येवुन काही कारण  नसताना फिर्यादीस शिवीगाळी दमदाटी करुन घराचा दर्शनी दरवाजा जोरजोरात आपटु लागला म्हणुन फिर्यादी यांने तु शिवागीळी करुन घराचा दरवाजा का आपटतोस अशी विचारणा केली असता त्याचा राग मनात धरुन फिर्यादीस शिवीगाळी दमदाटी करुन लाकडी  फाट्याने फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण केली तसेच त्यांचेतील भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची पत्नी  सरस्वती गजानन खांडेकर आली असता तिला देखील  याने ढकलुन दिले यात  गजानन  खांडेकर हे जखमी झाले