खेड (प्रतिनिधी) गणेशोत्सवात कोकण मार्गावर रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणाऱ्या एलटीटी-रत्नागिरी, पुणे- . रत्नागिरी, रत्नागिरी-पनवेल, पुणे-रत्नागिरी, रत्नागिरी-पनवेल गणपती स्पेशल या तिसऱ्या टप्प्यातील स्पेशल गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून खुले होणार आहे.
०११३१/०११३२ क्रमांकाच्या एलटीटी-रत्नागिरी साप्ताहिक, ०११४७/०११४८ क्रमांकाची पुणे – रत्नागिरी साप्ताहिक गणपती स्पेशल, ०११४४/०११४३ क्रमांकाची रत्नागिरी-पनवेल साप्ताहिक गणपती स्पेशल, ०१४४५/०१४४६ क्रमांकाची रत्नागिरी- पुणे साप्ताहिक गणपती स्पेशल, ०११४२/०११४१ क्रमांकाची रत्नागिरी-पनवेल साप्ताहिक स्पेशलच्या गणेशोत्सवात २० फेऱ्या धावणार आहेत.









