माजी उपसभापती राजु परुळेकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मानले आभार 

 

 

मालवण | प्रतिनिधी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय समिती सदस्यपदी नियुक्ती केल्याबद्दल मालवणचे माजी उपसभापती राजु परुळेकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत आभार व्यक्त केले आहेत.

 

दरम्यान, राजु परुळेकर यांनी खा. नारायण राणे, भाजपा नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचेही विशेष आभार व्यक्त केले आहेत.

 

या भेटी दरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सचिन आंबेरकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. कुडाळ मालवण क्षेत्र समितीत मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती (सतीश) राजु परुळेकर यांची नियुक्ती शासनाच्या आदेशपत्रा द्वारे करण्यात आली आहे.

 

शासनाच्या योजनेचा लाभ तळागळातील पात्र लाभार्थीना मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहणार असल्याचे परुळेकर यांनी सांगितले.