लांजा, (प्रतिनिधी ): लांजा शहराजीकच्या धुंदरे खालचीवाडी येथे विजेचा जोरदार धक्का लागून एका वानराचा जागीच मृत्यू होण्याची घटना गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.
घटनेची माहिती धुंदरे पोलीस पाटील विकास करंबळे यांनी लांजा वन विभागाला दिली. घटनेची मिळताच लांजा वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक नमिता कांबळे, श्रावणी पवार, रेस्क्यू टीम सदस्य अमित लांजेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. लांजाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. तोरस्कर यांनी या वानराची वैद्यकीय तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पंचनामा करून या मृत वानराला लांजा येथे आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.











