कार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव ; अल्प बचत प्रतिनिधींनाही केले सन्मानित
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य सर्वोत्कृष्ट व आदर्श संस्था म्हणून गौरविलेल्या सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग या संस्थेच्या संचालक मंडळ, शाखा नियंत्रक समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी व सर्व प्रकारचे एजंट यांचा स्नेह मेळावा महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात संस्थेचे कार्यक्षम अधिकारी, कर्मचारी तसेच अल्पबचत प्रतिनिधी अर्थात पिग्मी एजंटनाही त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्नेह मेळाव्याचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी संस्थेची विविध ध्येय धोरणे, विकासात्मक निर्णय यांची जोड घालत संचालक मंडळाने राबविलेल्या नवनवीन योजनांद्वारे आपल्या खातेदारांना बँकिंग सेवा देत असताना त्यामध्ये अधिक सुसूत्रता कशी आणावी या उद्देशाने ‘व्हिजन २०३०’ अन्वये नवीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पाचशे कोटी रुपये पर्यंत ठेवी नेण्याचा एक नवीन संकल्प या मेळाव्यात करण्यात आला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी प्रास्ताविक करताना या संस्थेमधील माजी संचालक मंगेश गावकर यांचे संस्थेला लाभलेले योगदान व मार्गदर्शनाबद्दल त्यांना सन्मानपत्र शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.
संस्थेच्या कार्यक्षम व्यवस्थापक सौ. मधुरा महेश रावराणे, कार्यक्षम अधिकारी प्रतिमा यशवंत कोरगावकर, कार्यक्षम शिपाई संजय सूर्यकांत चव्हाण त्याचप्रमाणे उत्तम एनपीए व्यवस्थापन केलेल्या शाखा पोईप सौ. प्रमिला महादेव परब, शिरगाव राजेश आबाजी सावंत, बांदा अमोल विठू वारंग, मालवण देवानंद अर्जुन धुरी, सर्वात जास्त इन्सेंटिव्ह घेणारे शाखा व्यवस्थापक राजन बाळकृष्ण राऊळ व ज्योती प्रसन्ना देसाई, पूर्णा पराग हिंदळेकर, शिवराम हरी तेली, शिपाई शशिकांत एकनाथ घोगळे,विश्वास अंकुश पालव या सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वात जास्त पिग्मी गोळा करणारे पाच एजंट श्रीप्रसाद पुंडलिक बांदेकर, सोनू रमेश पारकर, रामदास अनंत हुमरस्कर, जितेंद्र शंकर लाड, नम्रता लक्ष्मण सोनुर्लेकर यांनाही प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे पिग्मी एजंट अशोक सांगेलकर, व कर्मचारी सौ. शारदा वजराटकर यांच्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी संस्थेने दिलेले ध्येय उद्धीष्ट गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेडिकल व अपघाती विमा सुविधा संस्थेकडून मोफत स्वरूपात देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना व एजंटांना संस्थेचे संचालक सुभाष सावंत, संतोष मुसळे, दीनानाथ सावंत, चेअरमन बाबुराव कविटकर व संस्थापक चेअरमन पीटर डांटस यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व संपूर्ण प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी केले.
सदरच्या स्नेह मेळाव्यास संस्थापक अध्यक्ष पीटर डान्सट्स, संस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर,व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट माझी चेअरमन शिवराम जोशी, संचालक दीनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, संजय मुसळे, शामसुंदर सावंत, शांताराम पवार, बाबू वरक, प्रियांका गावडे, तसेच सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष शशिकांत गावडे व सर्व शाखांचे शाखाध्यक्ष व स्थानिक नियंत्रण समिती संचालक, सर्व पिग्मी एजंट, कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित होते. शेवटी व्हिक्टर आंतोन पिंटो यांनी उपस्थितांचे आभार मानले.











