कृषी दुतानी दिले जीवामृत बनवण्याचे प्रात्यक्षिक

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : वर्षानो वर्ष रासायनिक खत वापरून मातीला होणारी हानी लक्षात घेता आणि त्याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सावरवाड येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस-ओरोस चे कृषी दूत ने लोकांना नैसर्गिक शेती चा मार्ग दाखवण्या साठी जीवामृत बनवण्याचे प्रात्यक्षिक देले.

ह्या प्रात्यक्षिकात कृषी दुतानी जिवामृत तयार करायची प्रक्रिया दाखवली, तसेच त्याचे फायदे ही सांगितले आणि त्याचा वापर कसा करावा हे पण सांगितले.

हे प्रात्यक्षिक छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस चे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम

अधिकारी प्रसाद ओगले, व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अथर्व प्रशांत मठकर, लक्षदिप प्रकाश शेटकर, श्रीनिवास महादेव वाळके, ऋत्विक दिनेश तेली, अनिरुद्ध.पी, अरुणदेव.सी. पी यांनी उत्साहात पार पाडले.