देवगड किल्ला येथील हनुमान मंदिरातील हरिनाम सप्ताहाचे आमदार नितेश राणे यांनी घेतले दर्शन

देवगड

देवगड किल्ला येथील श्री हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहास कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले या वेळी त्यांचे देवगड किल्ला ग्रामस्थ मंडळ च्या वतीने शिवराम निकम यांनी स्वागत केले. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, नूतन तालुका अध्यक्ष राजेंद्र शेट्ये , उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, देवगड जामसंडे नगरपंचायत भाजप नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी उपस्थित होते.