खेडमधील भडगावात तरुणाची गळफासाने आत्महत्या

 

खेड (प्रतिनिधी)

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तांबेवाडी येथील रहिवासी व सध्या तालुक्यातील भडगाव-उसरेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या २२ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली.

विशाल नाथा भिसे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो घाणेकर चाळ, रूम नंबर २ येथे वास्तव्यास होता. स्वयंपाक घरातील लाकडाच्या चौकोनी भालाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.