लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

खेड (प्रतिनिधी) : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या 2026-27 या वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या निवडीत अध्यक्षपदी ला. अविनाश दळवी यांची निवड करण्यात आली असून, सेक्रेटरीपदी ला. उत्तम कांबळे सर, खजिनदारपदी ला. संदीपजी मोरे तसेच उपाध्यक्षपदी ला. सागरजी करवा यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे क्लबच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने यापूर्वीही समाजोपयोगी उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या नेतृत्वाखाली या कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.