बँक स्तरावर संस्थांकडून शंभर टक्के पूर्णफेड
आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक दिलीप रावराणे यांची उपस्थिती
वैभववाडी प्रतिनिधी
बँक स्तरावर शंभर टक्के पुर्णफेड केलेल्या वैभववाडी तालुक्यातील २५ संस्थाचा सत्कार करण्यात आला. आमदार नितेश राणे, जिल्हा बँक संघ अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते संस्था चेअरमन, संचालक व सचिव यांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा बॅकेचे संचालक दिलीप रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, सज्जनकाका रावराणे, सुधीर नकाशे, प्राची तावडे, नेहा माईणकर, सीमा नानीवडेकर, अंबाजी हुंबे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बॅकेचे सरव्यवस्थापक कर्ज विभाग प्रमुख के बी वरक, संगणक संस्था प्रमुख श्री.वसंत हडकर, क्षेत्र वसुली विभाग सरव्यवस्थापक भाग्येश बागायतकर, तालुका विकास विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर, विकास संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, गट सचिव, सभासद आदी उपस्थित होते.
३० जून अखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जा ची १०० टक्के वसुली केल्याबद्दल तालुक्यातील २५ संस्था, सोसायट्या यांचा सत्कार करण्यात आला. या संस्थांमध्ये श्री. देवी आदिष्टी विकास सेवा सोसायटी खांबाळे, श्री. गांगेश्वर विकास सेवा सोसायटी भुईबावडा, श्री दिर्बादेवी विकास संस्था तिथवली, चांदभारत विकास संस्था उंबर्डे, श्री केदारलिंग विकास सोसा हेत, केदारलिंग विकास संस्था करुळ, श्री शंकर प्रा. विकास संस्था नाधवडे, श्री, शिवाजी विकास संस्था तिरवडे, श्री महालश्मी विकास संस्था कोकिसरे, श्री अचिर्णे विकास संस्था, श्री कुंभजाई विकास संस्था कुंभवडे, वाभवे विकास संस्था, श्री रवळनाथ विकास संस्था एडगांव, श्री गांगेश्वर विकास संस्था गडमठ, श्रीदेव गांगो विकास संस्था लोरे, श्री ग्रामसेवा विकास विकास संस्था सोनाळी, सिध्दगांगेश्वर विकास संस्था उपळे, श्री देव ठाणेश्वर विकास संस्था नापणे, श्री.एकविरा विकास संस्था नानीवडे, श्री कुसुर विकास संस्था, श्री राम विकास संस्था नावळे, श्री ओम विकास संस्था आखवणे, श्री छत्रपती शिवाजी विकास संस्था अरूळे, श्री प्रकाश विकास संस्था कुर्ली, श्री रवळनाथ विकास संस्था सडूरे, या संस्थांचा समावेश आहे. विकास संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव याचा सत्कार आमदार नितेश राणे, अध्यक्ष मनिष दळवी, संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला.










