गुहागर l प्रतिनिधी : गुहागर तालुक्याच्या संपन्न झालेल्या आमसभेत मा. भास्कररावजी जाधव माजी मंत्री तथा पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा, गुहागर विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियान अंतर्गत तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचे एक लाखाचे पारितोषिक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत शाळांचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग या अंतर्गत शाळा परिसराचे सौदार्यीकरण , विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील , व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग , शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासाठी आवश्यक अवांतर उपक्रम , शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता , राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम , विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन, आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास , तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा , शाळा व्यवस्थापन समितीने आयोजित केलेले उपक्रम या सर्व मुद्यांच्या आधारे शाळांचे मुल्यांकन करण्यात आले.
या सर्व घटकांमध्ये शाळेने उत्तम प्रदर्शन करत गुहागर तालुक्यातून शासकीय शाळा या गटात तृतीय क्रमांक पटकाविला. मा. रायचंद गळवे गटशिक्षणाधिकारी गुहागर यांची प्रेरणा, आबलोली बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी आणि पाचेरी आगर केंद्राचे केंद्रप्रमुख मा विश्वास सुकलाल खर्डे यांचे मोलाचे लाभलेले मार्गदर्शन . शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक दिनेश काशिनाथ जाक्कर यांचे उत्तम नियोजन आणि मुद्देसूद केलेली मांडणी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनस्वी महेंद्र ठोंबरे, उपसरपंच सदानंद रामचंद्र जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर जानू जोशी, सर्व शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचे लाभलेले सहकार्य यामुळे हे यश संपादन केले आहे.










