कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट वाहतूक करणारा टँकर ( केए २८ एए ४७९५ ) रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस कॉन्स्टेब पि. एस. पार्सेकर, प्रवीण पाटील, संतोष शिंदे आदि घटनास्थळी दाखल झाले होते.










