खेड | प्रतिनिधी : किरकोळ कारणातून एकास तिघांनी बॅट ने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार खेड तालुक्यातील काडवली गजवाडी येथे १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
दिपक लक्ष्मण वारणकर, रामचंद्र सखाराम वारणकर, स्वाती दिपक वारणकर (सर्व रा. काडवली गजवाडी ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. फिर्यादी हे घरी एकटेच असताना तिघांनी फिर्यादी यांचे घरामध्ये घुसुन फिर्यादी यांना शिवीगाळी दमदाटी करून घरातुन ओढत खेचत बाहेर आणले तसेच नं. बॅटने मारहाण केली आहे. त्या नंतर तसेच फिर्यादीला त्याच्या अंगणात घेवुन जावुन फिर्यादीचे दोन्ही हात रस्सीने बांधुन फिर्यादीचे पायापासुन छातीपर्यंत रस्सी गुंडाळुन फिर्यादीला लाकडी मेढीला बांधुन ठेवत लाकडी बॅटने पाठीवर, दोन्ही हातावर, दोन्ही पायावर, कमरेवर मारहाण केलेली आहे. तसेच ग्रामस्थ विठ्ठल गुणाजी धाडवे हे त्यांच्या घरापासुन जात असताना फिर्यादीला मारत असल्याचे पाहुन त्याठिकाणी थांबले म्हणुन त्यांना देखील मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.











