पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल ची तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

 

 

मंडणगड l प्रतिनिधी –  मंडणगड तालुका तालुका विकास मंडळ संचलित, पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीय 17 वर्ष वयोगट ( मुले) खो – खो स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त करुन तालुका स्तरावर आपला खो – खो स्पर्धेतील अजिंक्यपदाचा दबदबा कायम ठेवला आहे. सेमी फायनल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल सारख्या मातब्बर संघाला चारी मुंड्या चीत करत फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केला व फायनल मध्ये आंबडवे हायस्कूलचा दणदणीत पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजयाला गवसणी घातली. जिल्हा स्तरासाठी हा संघ पात्र ठरला आहे.

खो – खो संघाला प्रशालेचे क्रीडा विभाग सांभाळणारे *श्री.इंगळे आर. व्ही.* यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रशालेच्या या यशाबद्दल संस्था, प्रशालेचे प्र.मुख्याध्यापक , शालेय समिती अध्यक्ष व सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती, पालक, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , माजी विद्यार्थी यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.