दापोली Breaking: एस.टी.आणि दुचाकी चा अपघात 

 

 

*दापोली – दाभोळ मार्गावर अपघातात एकाचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी…*

 

*दापोली प्रतिनिधी:-*

दापोली – दाभोळ मार्गावर उंबर्ले रोहीदासवाडी स्टाॅप जवळ दापोलीकडून दाभोळकडे जाणारी एसटी क्रमांक जम.एच.07 सी 7404 व दाभोळकडून दापोलीकडे येणाऱ्या दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुटणारी दापोली दाभोळ एसटी बस ही दाभोळकडे रवाना झाली होती. साडेअकराचे सुमारास ती उंबर्ले येथील बोरघरे यांच्या बागेसमोर आली असता दाभोळ कडून येणारी एक दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तैहसिन नियामुद्दीन मात्रोजी (वय सु. ३५, रा. वणकर मोहल्ला, दाभोळ) याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेल्या शमशुद्दीन इस्माईल दांडेकर रा. दाभोळ याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला पुढील उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस, एसटी आगाराचे अधिकारी दाखल झाले असून पोलीस पंचनाम्याचे काम उशिरा पर्यत सुरु होते.