वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी अतुल सरवटे यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र श्री. सरवटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. वैभववाडी भाजपा कार्यकारणीची बैठक येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी वैभववाडी भाजपाची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. तसेच वैभववाडी भाजपा युवा मोर्चाच्या नूतन अध्यक्षपदी अतुल गोविंद सरवटे रा. वेंगसर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीनंतर वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा कार्यकारणी सदस्य भालचंद्र साठे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, सदस्य राजेंद्र राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. वैभववाडी भाजपा युवा मोर्चा नूतन कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील सर्व युवकांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष अतुल सरवटे यांनी सांगितले.








