वेंगुर्ले : दाजी नाईक
मठ परबवाडी येथील दिवाकर शंकर येजरे वय 49 वर्ष याने आपल्या राहत्या घराच्या मधल्या खोली मध्ये लाकडी आडबाराला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मठ परबवाडा येथे एकाने आज शनिवारी पहाटे गळफास लावला असल्याची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांचा मुलगा दिवेश दिवाकर येजरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सराफदार करीत आहेत.









