ओझर विद्यामंदिर येथे मोफत नृत्य कार्यशाळा!

मसुरे | झुंजार पेडणेकर :भंडारी समाज महासंघातर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात, त्याचाच एक भाग म्हणून मुलांना नृत्यकले मध्ये आपले करिअर करता यावे, यासाठी ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे ३० एप्रिल आणि १ मे २०२६ या कालावधीत भंडारी समाज महासंघ आणि

सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ डान्स या संस्थेतर्फे मोफत नृत्यकला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मुलांना नृत्य शिकवण्यासाठी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शन सौरभ कांबळी आणि त्यांची टीम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सौरभ कांबळी इन्स्टिट्यूट ऑफ डान्स त्यांच्या या संस्थेतर्फे त्यांनी अनेक मुला मुलींना नृत्य शिकवले आहे, तसेच सौरभ कांबळी यांनी परदेशातसुद्धा आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

त्यांना भारतात आणि परदेशात नृत्यकलेत अनेक पुरस्कार मिळालेले आहे. या नृत्य कार्यशाळेच्या उद्घाटनाला प्रसिद्ध नृत्यांगना, प्रसिद्ध नृत्य कोरिओग्राफर आणि भंडारी महासंघाच्या कार्याध्यक्ष ऋतुजा कांबळी , ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र कदम आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन 30 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

तसेच ही नृत्य शिबिर सकाळी ०९:०० ते दुपारी १२:०० या वेळेत दोन दिवस संपन्न होणार आहे. या नृत्य शिबिराचा जिल्ह्यातील नवोदित नृत्य कलाकार, तसेच व्यावसायिक नृत्य कलाकार आणि शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भंडारी महासंघाच्या वतीने आणि ओझर विद्यामंदिरच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डी. डी. जाधव (मुख्याध्यापक). मो. ७७९६७००९७९ येथे संपर्क साधावा.