मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने दही हंडी उत्सवाचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी ग्रुप मळगावच्यावतीने २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३ ते ७ या वेळेत मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.यात प्रथम पारितोषिक ११,१११ रुपये व आकर्षक बक्षीस (पांडुरंग श्रावण राऊळ पुरुस्कृत) ठेवण्यात आले आहे.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री पांडुरंग राऊळ, सिद्धेश आजगावकर,मयूर गावकर,अक्षय राऊळ यांच्याशी संपर्क साधावा व सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी ग्रुप मळगावच्यावतीने करण्यात आले आहे.