केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची सदिच्छा भेट

 

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान माजी आमदार व भाजपाचे रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळ माने यांनी सदिच्छा भेट घेतली. मंत्रीपद मिळाल्यानंतर श्री. नाईक प्रथमच रत्नागिरीत आले, याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीमध्ये श्रीपाद नाईक यांच्या खात्याअंतर्गत विविध प्रकल्प निर्माण करता येऊ शकतात, याविषयी सकारात्मक चर्चा केली. या वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. बाबासाहेब परूळेकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे, जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.